जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेत नंदिनी शिंदे प्रथम

किल्लेधारूर दि.२३ (वार्ताहर) छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले जयंती निमित्त छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीदादा ठोंबरे आयोजित ऑनलाईन निबंध स्पर्धेत जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु नंदिनी शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवला.
लाॅकडाऊन असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर प्रतिबंध असल्याने घरी बसूनच विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा देता यावी यादृष्टिकोनातून ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि.१४ मे ते १७ मे दरम्यान घेण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेस विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. बीड जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांनी सुध्दा या निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवला. मोठ्या गटातून जिवन शिक्षण मा. व उच्च माध्यमिक विद्यालय गांजपूर ता. धारूर येथील कु. नंदिनी बालासाहेब शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवून धारूर तालुक्याची मान उंचावली आहे. त्या बद्दल तिचा जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते पालका समवेत सत्कार करण्यात आला. तिने राजे संभाजी महाराज यांचे जीवन कार्य या विषयी निबंध लिहिला होता. तिला रोख स्वरूपात छावा मराठा संघटनेच्या वतीने बक्षीस मिळणार आहे. तिच्या या यशा बद्दल ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. ईश्वर मुंडे, प्राचार्य विजयकुमार मुंडे, उपमुख्याध्यापक आरून समुद्रे, मार्गदर्शक महादेव केदार , सहशिक्षक नाथा ढगे, सौ. मंगल वटाणे, सोनवने, हनुमंत काळे, गणेश राऊत, पोपट कदम ,नितीन राऊत, युवराज जाधव, अमरदिप नेहरकर इत्यादींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.