कुमावत यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; माजलगावमधील कारवाईत दोघे गजाआड.

माजलगाव दि.15 जुन – आज दि.15 बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काळ्या बाजारात विक्री साठी जाणारा दोन ट्रक तांदूळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडला. याप्रकरणी दोघांना अटक करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एम. एच. 26 ए.डी. 7717 व एम. एच. 12 – 6795 या दोन ट्रक मध्ये भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी तांदूळ आणि गहू जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाली. खबऱ्याच्या माहितीनुसार या दोन ट्रक मधून काळ्या बाजारात माल जात असल्याचे कळताच त्यानुसार सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांच्या पथकाने या दोन ट्रक ची झाडाझडती घेतली.

यावेळी दोन्ही ट्रकमध्ये गहू आणि तांदुळाचा माल संशयास्पदरित्या आढळून आला. पोलिसांनी ट्रक चालक प्रभाकर पिराजी गायकवाड व नवनाथ जीवन अंकुशे यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया माजलगाव (Majalgoan) पोलिसांत सुरू होती.

( Kumawat’s squad’s aggressive action; Two arrested in operation in Majalgaon. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!