धारुर तालुक्यात ‘लाख मोलाची’ मदत; मयत मित्राच्या कुटूंबियांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून आधार .

किल्ले धारूर दि.5 मार्च – तालुक्यातील आंबेवडगाव येथील मयत पोलीस हवालदार सुधाकर पांडूरंग घोळवे यांच्या कुंटूंबाला मदत व्हावी म्हणून त्यांच्या बरोबर पोलीस भरती झालेल्या मित्रांच्या ग्रुपने पुढे होऊन केज उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक पंकज कुमावत यांचे हस्ते या कुंटूंबास एक लाख 6 हजार 700 रुपयाची मदत या कुंटूंबास सपूर्द केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

( ‘Lakh Molachi’ assistance in Dharur taluka; Support the family of a deceased friend through social media. )

धारूर (Dharur) तालुक्यातील आंबेवडगाव येथील महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) 1993 मध्ये बीड (Beed) येथे भरती झालेल्या पोलीस हवालदार सुधाकर पांडूरंग घोळवे डिसेंबर मध्ये 2021 मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. यामुळे घोळवे कुटुंब हे उघड्यावर येऊ नये म्हणून 1993 च्या पोलीस बॅच सोशल मिडीयावर ग्रुप अॕडमिन (group admin) अशोक नलावडे आणि खलील सय्यद यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून सुधाकर घोळवे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आव्हान केले.

सर्वांनी पुढाकार घेत मदत जमा केली व या मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळाला. एक लाख सहा हजार सातशे रुपयांचा निधी जमा झाला. सदर निधि केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत ( Additional Superintendent of Police Pankaj Kumawat ) यांच्या हस्ते मयत पोलीस हवालदार सुधाकर घोळवे यांची पत्नी शारदाबाई घोळवे व त्यांचा मुलगा सुरज घोळवे यांच्याकडे सुपूर्द केला.

यापुढेही या कुंटूंबास सर्वोत्परी मदत करण्यात येईल असे यावेळी ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. मदत निधी देत असताना केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) शंकर वाघमोडे, पोलीस हवालदार आसाराम नागरगोजे, जसवंत शेप, जाधव, शिवाजी शिनगारे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून मयत मित्राच्या कुटूंबियांना मदत देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!