सरत्या वर्षाला असाही निरोप….

किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर) धारूर येथील किल्ल्यात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराना तालूका मराठी (Marathi) पत्रकार परिषदेच्या वतीने उबदार ब्लँकेट (Blanket) चे वितरण नववर्षाच्या (New Year) आगमनापुर्वी सरत्या वर्षाला निरोप देत करण्यात आले.
धारूर (Dharur) तालूका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नव वर्षा (New Year) निमीत्त व दर्पण दिना निमीत्त सप्ताहा भरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन याची सुरूवात धारूर (Dharur) येथील ऐतिहासीक किल्ल्यातील (Fort) कामावरील परप्रांतीय मजूराना ब्लँकेट (Blanket) वाटप करुन करण्यात आली. सध्या कडाक्याची थंडी पडलेली असून या काळात मजूर कुटूंबाना मदत व्हावी व बालगोपाळा सह थंडी पासून बचाव करता यावा म्हणून त्यांना ब्लँकेट चे वितरण करण्यात आले. हे मजूर किल्ल्यात (Fort) उघड्या वर राहत असल्याने थंडीचे दिवसात त्यांना मदतीची गरज होती. त्यामुळे तालूका मराठी पत्रकार परिषदेचे वतीने या मजूरांना ब्लँकेट चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरूवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. आठवडाभरात दर्पण दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुरातत्व विभागाचे अभियंता नितीन चारूडे, जलदूत विजय शिनगारे, मराठी (Marathi) पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमूख अनिल महाजन, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर, जिल्हा संघटक हरिभाऊ मोरे, तालूकाध्यक्ष महादेव देशमूख, सचिव अतुल शिनगारे, राम शेळके, ईश्वर खामकर, आतीक मोमीन, रवि गायसमूद्रे, सतिश पोतदार, गोवर्धन बडे, दिनेश कापसे, शेख इरफान आदी उपस्थित होते.