BEED24

बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्याची दहशत ; शेळी ठार केल्याचा स्थानिकांचा दावा.

बीड दि.16 जुलै – बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्याची दहशत माजवली आहे. आष्टी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात शुक्रवारी सांयकाळी बिबट्याने शेळी ठार मारल्याचा दावा स्थानिकांनी केला असून परिसरात भितीचे (terror) वातावरण निर्माण झाले आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कोरोना व बिबट्या अशी दुहेरी संकटाना सामोरे जावे लागले आहे. काही महिन्यांपासून बिबट्याबाबत दिलासा मिळाला असताना शुक्रवारी आष्टी तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे बीडसांगवी, ब्रहमगांव, कणेसवाडी, आंबेवाडी परिसरातील शेतकरी दहशतीखाली आहेत. आंबेवाडी येथील पवार वस्ती जवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास बिबट्याने (Leopard) एका शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यातील शेळी मृत अवस्थेत आढळून आली आहे.

आंबेवाडी (ब्रम्हगांव) येथिल मच्छिंद्र नरवडे हे शेळी पालन करून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे ते आज आपल्या शेळ्या घेऊन चारण्यासाठी पवार वस्ती परीसरात गेले होते. सांयकाळी साडेपाच सहाच्या सुमारास शेळ्या घेऊन घराकडे परतत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळीवर हल्ला केला. बिबट्याने एक शेळी (goat) जबड्यात धरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. घटनास्थळावरून काही अंतरावर मृत अवस्थेत शेळी आढळून आली. यामुळे तालुक्यातील नागरिकांत आता पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले असून बीडसांगवी, ब्रहमगांव, कणेसवाडी, आंबेवाडी परिसरात बिबट्या गुराख्यांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे.

( Leopard terror again in Beed district; Locals claim to have killed a goat. )

Exit mobile version