‘मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरु द्या’…. दत्तात्रय भरणे यांंचं वादग्रस्त वक्तव्य.

सोलापूर दि.15 अॉगस्ट – सोलापूरचे पालकमंत्री (Guardian Minister) दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) आज स्वातंत्र्यदिना निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांच्याबद्दल नकळत आक्षेपार्ह गोष्ट बोलून गेले. सर्व अधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात असून शिवसेनेकडून (Shivsena) भरणे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान भरणे यांनी दिलगीरी व्यक्त करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

(‘Let the Chief Minister go and let him die’ …. Controversial statement of Dattatraya Bharane.)

सोलापूर (Solapur) महानगरपालिकेच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीमेचा कार्यक्रम आज दि.15 रविवारी पार पडला. प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव रोड येथे 43 एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांचा भांडवली निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलत असताना दत्ता भरणेंनी चंदनशिवे यांचे आभार मानले आणि मला खूप काही मिळालं आहे. तुम्हाला जो काही आशिर्वाद द्यायचा आहे तो दादांना द्या. अजित पवार (Ajit Pawar) माझे नेते आहेत असं म्हटलं. यावेळी सोलापूरच्या महापौर (Mayor) प्रस्तावाविषयी बोलत असताना पालकमंत्री दत्ता भरणें यांनी… “मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरु द्या हे काम आपलं आपण करु. त्यांच्याकडून आपण मोठा निधी घेऊ”, असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

माझी वसुंधरा अभियान हा कार्यक्रम पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी राबवलेला उपक्रम आहे. याच कार्यक्रमात बोलत असताना दत्ता भरणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल असे उद्गार काढल्यामुळे उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकारही चांगलेच अवाक झाले. आज दिवसभर सोलापूरात दत्ता भरणेंच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. भरणे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या वक्तव्याचा खुलासा भरणे यांनी केला असून दिलगीरी व्यक्त करत माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केल्याचे सांगितले आहे.।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!