कोरोंना विशेष

धारुरात पुन्हा दोन पॉझिटीव्ह; जिल्ह्यात आज मोठी संख्या

 

बीडःदि.१ अॉगस्ट- आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आज मोठा आहे. काल पाठवलेल्या तीन अहवाला पैकी धारुर शहरात पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती सोशल मेडियात येत आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आज परळीत ३२ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडल्याचीही माहिती येत आहे.

आज जिल्ह्यात कोरोनाचा भडका होण्याची शक्यता आहे. परळीत ३२ तर धारुर शहरात २ रुग्ण आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. धारुर शहरात आजच दोन गल्ल्या अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेल्या आहेत. तर यापुर्वी काही भाग आठ दिवसांपासून बंद आहे. आज पॉझिटीव्ह आढळून आलेल्या दोन रुग्णांमुळे शहराचा मोठा भाग तसेच पोस्ट, बँका बंद होण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत माहिती रात्री उशिरा येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!