बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनचा आज निर्णय; अशी आहे जिल्ह्याची कोरोनास्थिती.

बीड दि.31 मे – गेल्यावर्षीपासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊन (lockdown) करण्यात आलेला आहे. गेल्यावर्षी पाच महिने आणि यंदा दीड ते दोन महिन्यांपासून व्यापार बंद असल्यामुळे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केलेल्या कडक लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस असुन सध्याची कोरोनास्थिती पाहून आज बीडचे (Beed) जिल्हाधिकारी रविंद्र जगताप नवा आदेश काढण्याची शक्यता आहे.
(Lockdown in Beed district decided today; Such is the corona position of the district.)

राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत (Break the chain) कडक निर्बंध (restrictions) लागू केले आहेत. त्यानंतर विविध जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दररोज अनेक शहरात गर्दी दिसून येत आहे. फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. काल रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवत परिस्थितीनूसार निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे जाहिर केले.

गेल्या दीड वर्षापासून व्यापारी दुकाने बंद ठेवत असल्यामुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. बँकेचे व्याज, आयटी रिटर्न, जीएसटी भरणा, सी.सी.चे व्याज, कामगारांचे वेतन, दुकानाचे भाडे, वीजबिल, कुटुंबाचा खर्च हे कसे भागवायचे, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. व्यापाऱ्यांना शासनाने मदत दिली नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

1 जूनपासून व्यवहार सुरू होईल, अशी अपेक्षा शासनाकडे व्यापारी करीत असून व्यवहारासाठी ब्रेक द चेनची (Break the chain) नियमावली लागू करून सर्व व्यापार सुरू करावेत, अशी मागणी व्यापारी महासंघाकडून केली जात आहे. सर्व व्यापारी अडचणीत आहेत. 1 जूनपासून सर्व व्यापार ठराविक वेळेत सुरू करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाची सद्यस्थिती…
बीड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 86 हजार 55 झाली आहे. तर एकुण मृत्यूचा आकडा 1 हजार 953 आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 16.13 टक्के, मृत्यू दर 2.26 टक्के तर रिकव्हरी रेट 91.99 टक्के आहे. जिल्ह्यात आजवर 79 हजार 163 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

काय निर्णय होवू शकतो.
राज्य शासनाच्या नवीन नियमावलीनूसार पॉझिटीव्हीटी रेट (Positivity rate) 10 टक्के असणारी व 20 टक्क्यापेक्षा जास्त असणारी अशी दोन गट करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट (Positivity rate) या दोन्ही गटाच्या मध्यात असल्याने लॉकडाऊन (lockdown) बाबत तज्ञांशी विचारविनिमय करुनच निर्णय घेतला जाणार आहे. परिस्थितीनूसार काही अंशी निर्बंधात (restrictions) सुट मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!