दिवसा मुंबईच्या महापौर, रात्री कोरोना हॉस्पिटलमधे नर्स म्हणून ड्युटी.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई; आयुष्यात नौकरीची सुरुवात यांनी नर्स म्हणून केली. आज जेव्हा देशाला गरज आहे तेव्हा यांना पुन्हा एकदा याच रोल मधे यावंसं वाटतंय. स्वइच्छेने, कोणीच फोर्स केलेला नाही की काही नाही.
कोरोना सुरू झाल्यापासून या जिथं हॉटस्पॉट होईल किंवा रुग्ण वाढतील अशा मुंबईतल्या सगळ्या ठिकाणी भेटी देऊन , सगळ्या दवाखान्याच्या तयारी किती आहेत ते जातीने पाहून, जे कमी आहे त्याची या व्यवस्था करतायत. अन इतक्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे प्रिकॉशन म्हणून यांना 14 दिवस कवारंटईन करण्यात आलं होतं. अन तो काळ दोनच दिवसांपूर्वी संपलाय. पण यांना देशाची ,आपल्या लोकांची सेवा स्वस्थ बसू देत नाहीये. लोकांची सेवा करणाऱ्या आपल्या नर्स भगिनीनसोबत, डॉक्टर्स सोबत खांद्याला खांदा लावून यांना लढायचंय. म्हणून त्या आता पुन्हा आपला नर्सचा वेष परिधान करून आज कामाला उतरल्या आहेत. मुंबईच्या नायर हॉस्पिटल मधे त्या दिवसा महापौर म्हणून सगळी व्यवस्था पाहतील आणि नंतर हॉस्पिटल मध्ये जाऊन नाईट शिफ्ट करतील. खरंतर त्यांनाही रिस्क आहे इन्फेक्शनची पण तरीही ही भीती त्यांना आपलं कर्तव्य पूर्ण करण्यापासून मात्र रोखू शकली नाही.
आपण सगळे मिळून त्यांना अन सगळ्या फ्रंटलाईन वर्कर्सच्या या कष्टाला यश मिळो आणि त्यांचीही तब्येत सुदृढ राहो, हीच सदिच्छा देऊयात आणि त्यांच्या यशासाठी प्रार्थना करूयात.