भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्यामुळे चर्चेला उधान.

बीड दि.1 अॉक्टोबर – भाजप नेत्या (BJP Leader) पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची तब्येत बिघडल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर येत असताना मुंडे यांच्या प्रकृतीत झालेला बिघाड राजकीय चर्चेचे कारण ठरत आहे.

(BJP leader Pankaja Munde’s health deteriorates; Fadnavis’s visit to Marathwada sparked discussion.)

मिळालेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुढील तीन चार दिवस पूरग्रस्त मराठवाडा दौरा असणार आहे. याच दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. ट्वीट करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन चार दिवस आराम करणार आहे. फोन कॉल (Phone call) घेणंही शक्य नाही.

देवेंद्र फडवीस यांच्या दौऱ्याआधीच पंकजा मुंडे यांची अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. बरं वाटत नसल्याने पंकजा मुंडे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणालाही भेटू शकणार नाही आणि आराम करणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या ट्वीटवरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा दौरा…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याची घोषणा केली आहे. फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी आहेत. पंकजा यांनी स्वत: याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. फडणवीसांकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!