कोरोंना विशेष

धारुरमधील आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर)- आजची पॉझिटीव्ह संख्या समाधानकारक आली आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या १० संशयितांच्या ॲन्टीजन (antigen) तपासणीत केवळ २ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली. तर येथून काल पाठवण्यात आलेली २१ स्वॅब निगेटिव्ह आली आहेत. एकंदरीत आज कोरोना बाधितांची संख्या आवाक्यात असल्याचे दिसुन येते.

काल वाढलेली संख्या आज पुन्हा कमी होवून दिलासा मिळाला आहे. आज १० ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात २ पॉझिटीव्ह आढळली तर २१ स्वॅब (Swab) नमुन्यात एकही पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाला सल्याने समाधान व्यक्त होत आहे. आज २२ जनांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (Antigen)

१. २५ वर्षीय पुरुष, कासारी, ता.धारुर

२. ४८ वर्षीय पुरुष, जगन्नाथ नगर, धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!