राजकीय

Madhav Nirmal माधव निर्मळ यांनी माजलगावातून फुंकले रणशींग.

57 / 100 SEO Score

माजलगाव दि.5 नोव्हेंबर – Madhav Nirmal माजलगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांनी आज दि.5 मंगळवार रोजी माजलगाव येथील माँ वैष्णवी मंगल कार्यालयात भव्य कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करुन प्रचाराचे रणशींग फुंकले.

माजलगाव मतदारसंघात ओबीसी चेहरा म्हणून माधव निर्मळ यांच्याकडे पाहिले जात आहे. आज दि.5 मंगळवार रोजी धारुर शहरापासून माजलगावपर्यंत भव्य रॕली काढण्यात आली. धारुर शहरासह माजलगाव शहरातून वैष्णवी मंगल कार्यालयापर्यंत रोड शो करत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या रोड शोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. गोपिनाथ मुंडे यांच्यासह भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्या प्रतिमासह निवडणूक निशाणी प्रेशर कुकर दिसून आल्या. वैष्णवी मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना माधव निर्मळ यांनी संबोधित केले. याप्रसंगी बोलताना निर्मळ यांनी यापुढे सदैव ताईसोबत राहण्याचा संकल्प व्यक्त करत जिथे नाही कमळ तिथे माधव निर्मळ अशी घोषणा केली. पुढे बोलताना प्रत्येक कार्यकर्त्यांने स्वतःला उमेदवार समजून एकजुटीने विजय मिळवून सर्वसामान्याचा आवाज विधानभवनात पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंचावर पी.टी. चव्हाण, कल्याण आबुज, बबनराव सरवदे, राजाभाऊ निर्मळ, सतीश बडे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!