धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बडे यांचे निधन.

किल्लेधारूर दि.23 मे – येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती (chairman) महादेव बाबन बडे (62) यांचे औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना पहाटे 2 वाजता निधन झाले.
(Mahadev Bade, Chairman, Dharur Agricultural Produce Market Committee passed away.)
तालुक्यातील कासारी बोडखा येथील रहिवासी व भाजपाचे (BJP) प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले महादेव बडे यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण (Corona Positive) झाली होती. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ही त्यांना ओळखले जात.
मागील पंचवार्षिक निवडणूकीत ते भोगलवाडी गणाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रचंड मतांनी विजयी झाले होते. यानंतर मात्र पराभुत झाल्यानंतर त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dharur Agricultural Produce Market Committee) सभापती (chairman) पदी त्यांची निवड करण्यात आली होती. अतिशय संयमी हसतमुख म्हणून धारुर व वडवणी तालुक्यातील कार्यकर्ता म्हणूनही ते परिचित होते.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांनी कासारी बोडखा ग्रामपंचायत वर निर्विवाद वर्चस्व मिळवले. कासारी बोडखा येथे त्यांच्या पत्नी सुनंदा सरपंच तर मुलगा सदाशिव उपसरपंच आहेत. बडे यांनी ऊसतोड कामगार मुकदम ते जिल्हा परिषद सदस्य, सभापती असा राजकीय प्रवास केला.
काही दिवसांपुर्वी कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आल्यामुळे त्यांच्यावर औरंगाबाद (Aurangabad) येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे 2 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे तालुक्यातील भाजपाचा (BJP) एक प्रामाणिक राजकीय कार्यकर्ता गमावल्याची प्रतिक्रिया येत आहेत.