धनंजय मुंडेवर प्रेम करणाऱ्या नगरसेवकाने दंडवत घालत केला नवस पुर्ण….!

परळीः दि.१८(प्रतिनिधी) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आलेले संकट दूर होण्यासाठी केलेला नवस परळी (Parli) नगर परिषदेचे त्यांचे कटृर कार्यकर्ते असलेल्या नगरसेवकाने आज पुर्ण केला. संकटात सापडलेल्या भक्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या कृपेने सामाजीक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यावर जाणुन बुजुन रचण्यात आलेले बालंट दुर होत असुन हे शुक्लकाष्ट दुर झाल्याने माझा नवस पुर्ण झाला असुन वैद्यनाथाच्या कृपेने ना.मुंडे हे दोषमुक्त व्हावेत अशी प्रार्थना नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी दंडवत घालून प्रभु वैद्यनाथ चरणी केली.
सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर तथ्यहिन व चारित्र्यहनन करणारे आरोप करण्यात आले होते. ना.मुंडे हे वैद्यनाथाचे निस्सीम भक्त असल्याने प्रभु वैद्यनाथाने हे बालंट दुर करावे यासाठी दंडवत घालण्याचा नवस परळी (Parli) नगर परिषदेचे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी केला होता. ना. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप काही दिवसातच दुर होत गेले असुन आरोप करणाऱ्या महिलेचा खरा चेहरा समाजासमोर आल्याने गोपाळ आंधळे यांनी सोमवार दि.१८ रोजी दुपारी १२.३० वा.सावतामाळी मंदिर येथुन आपल्या पत्नी सौ.शुभांगी आंधळे यांच्यासह दंडवत घालण्यास सुरुवात केली. न.प.गटनेते वाल्मीक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संत सावतामाळी मंदिर येथुन सुरु झालेला हा दंडवत राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, नेहरू चौक, संत जगमित्रनागा महाराज मंदिर येथुन प्रभू वैद्यनाथ मंदिर येथे करण्यात येवुन या प्रकरणातून ना.धनंजय मुंडे यांना दोषमुक्त करत षडयंत्र करणाऱ्याचा चेहरा समाजासमोर यावा अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, माजी न.प.उपाध्यक्ष आयुब पठाण, पं.स.उपसभापती बालाजी मुंडे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर, नगरसेवक विजय भोयटे, चेतन सौंद॓ळे, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, वैजनाथ सोळंके, तुळशीराम पवार, माधवराव ताटे, प्रभु आंधळे, शंकर आडेपवार, रावसाहेब आंधळे,
प्रकाश शिंदे, राजाभाऊ गित्ते, सतिष जगताप, रमेश भोयटे, सुरेश नानवटे, हनुमान आगरकर,बळीराम नागरगोजे, दिनेश आमले, बाळासाहेब काळे, सचिन आरसुडे, राजकुमार डाके, प्रमेश्वर साखरे ,भागवत गित्ते, मोहन साखरे, हरून भाई, राम आंधळे, प्रदिप कळंबे, गणेश खाडे, आशा घाडगे, अनुसया आगरकर , शुभांगी आंधळे, रंजना खरोळकर, गंगाबाई आगरकर, वृदांवनी सातपुते, सत्यभामा बहिरे, अरूणा वाळके, मिरा शिंदे, रेखा कापसे, निता धायगुडे, सुनंदा बारगजे आदींची उपस्थिती होती.