बीड जिल्ह्यात 49 कोरोनामुक्त तर 60 नवीन बाधित; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.19 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2219 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 60 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2159 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाधितांची संख्या पन्नासपेक्षा जास्त असून 49 जन कोरोनामुक्त झाले आहेत.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-13, अंबाजोगाई-14, आष्टी-15, धारुर-0, गेवराई-1, केज-12, माजलगाव-1, परळी-1, पाटोदा-1, शिरुर-1, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पन्नासच्या आत आलेली कोरोना बाधितांची संख्या चालू आठवड्यात वाढली होती. ती काल पन्नासच्या आत होती मात्र आज पुन्हा वाढ होवून 60 बाधित आढळली आहेत. तर 49 जन कोरोनामुक्त होवून घरी सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज 3, 391 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 28 हजार 561 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.09 टक्के आहे.

राज्यात शनिवारी 80 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 699 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 47 हजार 919 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!