शेतीच्या वादातून एकास कुऱ्हाडीचा वार
सोनिमोह्यातील प्रकार

किल्लेधारूर दि.१५(प्रतिनिधी) शेतीच्या वादातून सोनिमोहा येथे रावसाहेब बबन दराडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात घडली. यात अन्य तिन जन जखमी झाले आहेत.
सोनिमोहा शिवारात शेतीच्या बांधावरील कुरबुरीवरून रामहारी पांडूरंग दराडे, सुदाम पांडूरंग दराडे, पांडूरंग दराडे व अन्य चार महिलांनी एकत्र येत भांडणाच्या तयारीने येवून व जीवे मारण्याच्या हेतूने कुराड, तलवार घेवून रावसाहेब बबन दराडे, बबन सादबा दराडे, राणी बालासाहेब दराडे, आश्वीन रावसाहेब दराडे यांच्या अंगावर धावून गेले. या वेळी रावसाहेब दराडे यांच्या डोक्यात रामहारी दराडे याने कुराडीचा वार केला. यात रावसाहेब दराडे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या वेळी बबन दराडे, राणी दराडे, आश्वीनी दराडे यांनाही मार लागला आहे . या भांडणात कुऱ्हाड, तलवारीचा वापर झाल्याने सोनिमोहा येथे दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत धारुर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.