महिला कोविड योध्द्यांचा माजलगाव विकास प्रतिष्ठाणकडून सन्मान…
महिलांनी स्वतःच्या कृर्तत्वाने स्वतःची ओळख निर्माण करावी-अॕड.पल्लवीताई सोळंके

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) कोरोना (Corona) काळात स्वतः ग्रामपातळीवर खऱ्या अर्थाने कोविड (Covid) योद्धा म्हणून काम करणाऱ्या आंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला ग्रामसेवक, महिला पोलिस कर्मचारी, नगर परिषदेतील महिला स्वच्छता कर्मचारी यांना विषेश कोविड योद्धा पूरस्काराने सन्मानित करत सन्मानपत्र आणि बक्षीस वाटप कार्यक्रम माजलगाव विकास प्रतिष्ठाण (Majalgoan Vikas Pratishthan) च्या वतीने माजलगाव मतदारसंघातील माजलगाव, वडवणी व धारुर (Dharur) तालुक्यात घेण्यात आला. धारुर येथील महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना प्रतिष्ठाणच्या ॲड. पल्लवीताई सोळंके (Pallavi Solanke) यांनी महिलांनी स्वतःच्या कृर्तत्वाने स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले.
संपूर्ण जगभर कोविड-१९ रोगाने थैमान घातले असताना ग्राम पातळीपर्यंत अत्यंत महत्वाची कामगिरी बजावलेली महिला दुर्लक्षित राहिली. याची दखल घेत माजलगाव विकास प्रतिष्ठाणच्या वतीने माजलगाव मतदारसंघातील धारुर (Dharur), वडवणी व माजलगाव या तीन तालुक्यातील कोरोना (corona) काळात स्वतः ग्रामपातळीपर्यंत खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या जवळजवळ दिड हजार महिलां अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला ग्रामसेवक, महिला पोलिस कर्मचारी, नगर परिषदेतील महिला स्वच्छता कर्मचारी यांना विषेश कोविड योद्धा पूरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात हा भव्य कार्यक्रम घेण्यात आला. या महिलांना विषेश कोरोना योद्धा पूरस्काराने सन्मानित करत त्यांना सन्मानपत्र आणि भेटरुपी बक्षीस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजलगाव विकास प्रतिष्ठान (Majalgoan Vikas Pratishthan) सदस्या अॅड. पल्लवीताई सोळंके, प्रतिष्ठाणच्या सचिव लिलाताई देशमूख, पोलिस निरीक्षक सुरेखा धस, डॉ. श्रद्धा लातूरकर, डॉ. उषा बांगर, डॉ. स्वाती डिकले, डॉ. संध्या वाघमारे, पंचायत समिती चंद्रकला नागरगोजे, माजी सभापती अशालता सोळंके, धारूर नगर परिषदेच्या गटनेत्या उज्वला शिनगारे, राष्ट्रवादी युवती तालूका अध्यक्षा विशाखा गायकवाड, प्राचार्य सिरसाठ यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित महिलांना सह पोलिस निरीक्षक सुरेखा धस, डॉ.श्रद्धा लातूरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना अॕड. पल्लवीताई सोळंके (Pallavi Solanke) यांनी महिलांची ओळख ही केवळ नवऱ्याच्या नावामुळे नसेल तर ती स्वतःच्या कृर्तुत्वाने असावी यासाठी आज महिलांनी कार्यरत राहिले पाहिजे. मकर संक्रातीला केवळ हाळदी- कुंकू म्हणजे स्त्रियांनीच पुरूषांसाठी केलेल्या श्रद्धेसाठी केलेला कार्यक्रम आसतो. आपल्या महिलांनी स्वर्कत्वावातून आपली वेगळी ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नेताजी सोळंके, संपदा रणदिवे तर आभार प्रदर्शन प्राचार्य शिवदास सिरसाठ यांनी केले.