Majalgoan जयसिंह सोळंके समर्थक कार्यकर्ते मुंबईत ; माजलगावात काका पुतण्यात काय घढतय ?

मुंबई दि.28 आक्टोंबर – Majalgoan माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जयसिंह सोळंके समर्थकात अस्वस्थता दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोहन जगताप यांची उमेदवारी जाहिर होताच जयसिंह सोळंके समर्थकांनी मुंबईत डेरेदाखल होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यामुळे माजलगावात काका पुतण्यात काय घडतय याकडे लक्ष लागून आहे.
चार दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून माजलगाव मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सदर घोषणा होताच जयसिंह सोळंके समर्थक कार्यकर्त्यांनी आ. प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. यानंतर मतदारसंघात अजित पवार व कार्यकर्त्यांची ओडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे चांगलीच खळबळ माजली. या क्लिपमध्ये रमेश आडसकर यांना उमेदवार गृहित धरुन तसा निर्णय घेण्यात आला असून मी कोरा ए बी फॉर्म दिला असून घरात बसुन त्यांनी निर्णय घ्यावा असे अजित पवार म्हणत असल्याचे दिसून आले. यातच काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोहन जगताप हे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. यामुळे जयसिंह सोळंके समर्थक कार्यकर्त्यांनी थेट मुंबई गाठली. मुंबईत कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस राहिला असताना माजलगावात काका पुतण्या वादाची ठिणगी पडल्याची चर्चा होत असून कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.