माझं गाव

passed away… सरस्वती फावडे यांचे निधन ; माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे यांना पत्नी शोक.

55 / 100

किल्लेधारुर दि.26 जून – passed away धारुर शहराचे माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे यांच्या पत्नी सरस्वती फावडे (वय 64) यांचे अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी सांयकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

passed away Saraswati Fawde passed away.

याबाबत अधिक माहिती अशी की, धारुर Dharur शहरातील गायकवाड गल्ली येथील रहिवासी तथा माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे यांच्या पत्नी सरस्वती (वय 64) गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी विवेकानंद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज दि.26 जून सोमवार रोजी दुपारी पावणेतीन वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती शेषेराव फावडे, एक मुलगा, मुलगी, सुना व नातवंड असा परिवार आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांचे लहाने चिरंजीव बाळासाहेब फावडे यांचे निधन झाले होते. वर्षभरात फावडे कुटूंबीयांना दुसऱ्यांदा  दुःखाचा धक्का बसला.   त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर सितेची न्हानी परिसरातील स्मशानभुमीत सांयकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा सांयकाळी 7 वाजता गायकवाड गल्ली, धारुर Dharur येथील निवासस्थानापासून निघणार असल्याची माहिती नातेवाईकानी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!