
मुंबई दि.2 सप्टेंबर – Manoj Jarange Patil मराठा आरक्षण मुद्द्यावर पाच दिवसांपासून मुंबई येथे मनोज जरांगे पाटिल यांचे आमरण उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या असून कायदेतज्ञाचा सल्ला घेवून रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई सोडणार असल्याचे जरांगे यांनी जाहिर केले. दरम्यान मुंबईसह राज्यात मराठा समाजाकडून जरांगे यांचे उपोषण यशस्वी झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा होत आहे.
आज दि.2 सप्टेंबर रोजी विखे पाटलांच्या नेतृत्वात उपसमितीची जरांगे पाटलांची भेट घेत प्रमुख मागण्याना मंजुरी देण्यात आली. यात प्रामुख्याने हैदराबाद गॅझेटइयर अंमलबजावणीस उपसमितीने मंजुरी दिली आहे. सातारा गॅझेटइयर लवकरच जलद गतीने मंजूर करण्यात येईल. मराठा आंदोलकांवरील केसेस कोर्टात जाऊन मागे घेण्याचा जीआर काढण्यात येईल. मराठा आंदोलनात मयत झालेल्या लोकांना एका आठवड्यात आर्थिक मदत देण्यात येईल व कुटुंबातील एका सदस्याला राज्य परिवहन मंडळात घेण्यात येईल. मराठा आणि कुणबी एकच आहे हा जीआर दोन महिन्यात करण्यात येईल. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते.



