बीड कोरोना अपडेट… आज बाधितांचा आकडा वाढला; पहा तालुकानिहाय आकडेवारी ….

बीड दि.11 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1120 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 39 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1081 जण निगेटिव्ह आहेत. आज 8 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-8, अंबाजोगाई-9, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-0, केज-2, माजलगाव-3, परळी-8, पाटोदा-3, शिरुर-5, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आज पुन्हा वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार काल 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2842 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 108 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 1.82 झाला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात 33 हजार 470 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 29,671 कोरोनमुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 69,53,514 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.98 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 2,06,046 रुग्ण अॅक्टीव आहेत. आतापर्यंत 1,41,647 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.