माझं गाव

Maratha reservation… धारुर तालुक्यातही मराठा आरक्षण प्रश्नी पुढाऱ्यांना गावबंदी…

50 / 100 SEO Score

किल्लेधारूर दि.23 अॉक्टोंबर – Maratha reservation मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रात 515 गावांत सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला असून धारुर तालुक्यातील चोरांबा या गावातही मराठा आरक्षणाचा निर्णय होई पर्यंत लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय पुढारी यांना चोरांबा गावात प्रवेश दिला जाणार नाही असा ठराव ग्रामपंचायतच्या Gram panchayat ग्रामसभेत घेण्यात आला.

महाराष्ट्रात मनोज जरांगे Manoj Jarange यांच्या अंतरवली सराटी येथील आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा विषय आक्रमकपणे समोर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज एक जूटीने प्रखर भुमिका घेत असून राज्यात जवळजवळ 515 गावांत सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार करण्यासारखे निर्णय घेण्यात आले आहेत. यातच धारूर तालुक्यातील चोरांबा ग्रामपंचायतच्या Gram panchayat ग्रामसभेत लोकप्रतिनीधी व सर्वपक्षीय पुढारी व पुढार्‍यांच्या बगलबच्चांना गावात प्रवेश नाही असा ठराव घेण्यात आला. हा ठराव उपसरपंच राहूल चव्हाण यांनी मांडला तर यांला अनूमोदन ग्रा.प. सदस्य गयाबाई शंकर मुळे यांनी दिले. ग्रामस्थांनी एकमताने हा ठराव घेतला. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्या शिवाय आता माघार नाही असे हि एकमुखी ठरवण्यात आले. या निर्णयामुळे इतर गावातूनही असा सुर निघत असून चोरांबा ग्रामस्थाचे एकजूटीचे व निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!