Maratha Reservation… धारुरसह बीड जिल्ह्यात कशी असेल बससेवा ? पहा महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती.

किल्लेधारुर दि.2 सप्टेंबर – Maratha Reservation… जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या निमित्ताने सर्वत्र हिंसक प्रतिक्रिया येत असल्याने आज बीड जिल्ह्यातील धारुरसह सर्व आगाराची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली आदी जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. ( Maratha Reservation… How will the bus service be in Dharur and Beed district? See what is the situation in Maharashtra.)
जालना Jalna जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीसाठी उपोषणाला बसले होते. उपोषणात जरांगे यांची प्रकृती खालावल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला, शांततेने सगळं चाललं होतं. मात्र चर्चेनंतर पोलिस Police बळाचा वापर करुन आंदोलकांना तिथून हुसकून लावण्याचा प्रयत्न झाला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत बाचाबाची होवून पोलिसांकडून Police तेथील महिलांसह तरुणांवर प्रखर लाठीहल्ला करण्यात आला. यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. रात्री उशिरा शाहगड येथील बसस्थानकात 4 बसेस पेटवण्यात आल्या. तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली. याचा सर्वाधिक फटका बस सेवेवर होणार असून बीड Beed जिल्ह्यातील सर्व आगारातून बसेस सोडण्यात येणार नसल्याचे जाहिर करण्यात आले. दरम्यान मराठा क्रांति मोर्चाची आज मुंबईत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
धारुरमध्ये तरुण रस्त्यावर …
दरम्यान, जालन्यातील Jalna घटनेचा निषेध करत बंदची हाक देण्यासाठी धारुर Dharur शहरात आज (दि.2 ) शनिवारी शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. धारुर Dharur शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. येथील आगारातून सोडण्यात येणाऱ्या सर्व बस सेवा बंद असल्याची माहिती आगार प्रमुख भारत कोमटवार यांनी दिली.