मराठवाडा चक्रीवादळाच्या तडाख्यात; लातूर व बीड जिल्ह्यातही खबरदारीचे आवाहन;

बीड दि.१४:- मध्य महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील काही जिल्हयात 13 ते 17 आक्टोबर 2020 या काळात विजेच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मूसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांच्या सुचनेनुसार हा बीड, लातूर सह मराठवाडयातील जिल्ह्यात हा इशारा देण्यात आला आहे.
गेली दोन दिवस हैद्राबादमध्ये चक्रीवादळानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे हाहाकार माजला असून १४ व १५ तारीख महाराष्ट्रातील विविध भागासाठी अलर्ट राहण्याची आहे. उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ १५ तारखेला महाराष्ट्रात येईल. राज्य शासनाने कालच राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना १४ ते १७ पर्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गेली दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात हलका पाऊस पडत असून सुर्यदर्शनही नाही. चक्रीवादळ cyclone निर्माण झाल्यामुळे सतर्कता बाळगण्याची सुचना देण्यात आली आहे. लातूर- सोलापूर- उस्मानाबाद- परंडा-करमाळा- कर्जत- कल्याण- मुंबई मार्गे अरबी समुद्र किंवा नांदेड- परभणी- बीड-नगर-कल्याण-मुंबई ते अरबी समुद्र अशा दोन पैकी एका मार्गाने सदरील चक्रीवादळ जाईल. एका समुद्रातून निघालेलं वादळ भू मार्गाने वाटचाल करून दुसऱ्या समुद्रात जाण्याची इतिहासातील ही बहुतेक पहिलीच घटना असेल. उत्तरेकडून येणारी थंड हवा व बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्राच्या दिशेने निघालेले हे चक्रीवादळ cyclone आहे. यामुळे चक्रीवादळ cyclone ज्या मार्गानं जाईल तिथं व आसपासच्या परिसरात प्रचंड वादळ व विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सारखा पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
बीड जिल्ह्यात खबरदारीची उपाययोजना म्हणुन खालील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
1. विजेच्या गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालुन बसा.
2. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओटयावर थांबू नका.
3. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालु असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
4. तारांचे कुंपन विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासून दुर रहा.
5. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका:
1. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका.
शॉवरखाली अंघोळ करु नका.
घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नका.
2. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालु असतांना लोखंडी धातूच्या सहायाने उभारलेल्या तंबुमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
3. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
4. धातुच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
5. जर आपण घरात असाल तर उघडया दारातून अथवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे,
असे बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी, संतोष राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
marathwada-hit-by-cyclone-cautionary-appeal-also-in-latur-and-beed-districts