व्यापाऱ्यांना 5 मार्चचा अल्टीमेटम… नसता शटरडाऊन

वडवणी दि.3(प्रतिनिधी)- पहिल्या दिवशी एकाही व्यापारीने कोरोना चाचणी न केल्यामुळे वडवणी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर वडवणी तहसील कार्यालयात आज महसूल व आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासन व नगरपंचायत कर्मचारी त्यांच्यामध्ये बैठक पार पडली यामध्ये व्यापाऱ्यांनी 5 मार्चपर्यंत कोरोना चाचणी न केल्यास दुकानाचे शटरडाऊन करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार वैशाली पाटील यांनी बैठकीत व्यक्त केले.
(March 5 ultimatum to traders … no shutterdown)
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळून येत असल्याने दि. 1 मार्च पासून व्यापाऱ्यांसाठी कोरोना (corona) अँन्टीजन चाचणी मोहिम राबवण्यात येत आहे. परंतू या मोहिमेकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. वडवणीत तर ऐकाही व्यापाऱ्यांने तपासणी केली नसल्याचे दिसुन आले. यामुळे दि. 2 मार्च रोजी वडवणी तहसील कार्यालयात आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मध्ये आजपासून नगरपंचायत कर्मचारी वडवणी शहरात रिक्षाद्वारे जाहिरात करून नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जर या कोरोना चाचणीमध्ये कोरोना (corona) बाधीत रुग्ण पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आल्यास वडवणी शहरात कोरोना केअर सेंटर स्थापित करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन या कोरोना चाचणीसाठी सज्ज झाले आहे.
दिनांक 5 मार्च नंतर जे कुणी व्यापारी कोरोना चाचणी करणार नाहीत त्यांच्या दुकानाचे शटरडाऊन (shutterdown) करून दंडात्मक कार्यवाही करणार असल्याचे मत तहसीलदार वैशाली पाटील यांनी वडवणीच्या बैठकीत व्यक्त केले. व्यापारी बांधवांसह इतर नागरिकांनी देखील कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन देखील तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे. यावेळी आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.