Market committee महाराष्ट्रात महाविकास आघाडी नंबर वन ; माजलगाव बाजार समिती आमदार सोळंकेंच्या ताब्यात.

माजलगाव दि.30 एप्रिल – Market committee महाराष्ट्रात महाविकास आघाडी नंबर वन ठरली आहे. माजलगाव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती राखण्यात आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांना यश मिळाले आहे. अत्यंत चुरशीची लढत होवून 18 पैकी 11 जागांवर राष्ट्रवादी (NCP) प्रणीत आघाडीने विजय मिळवला.
( Market committee election … Mahavikas Aghadi number one in Maharashtra; Majalgaon Bazaar Committee is under the control of MLA Solanke. )
महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणूकीत सांयकाळपर्यंत सर्वाधिक 109 बाजार समित्यावर वर्चस्व मिळवत महाविकास आघाडी नंबर वन ठरली आहे. राज्यातील सर्वाधिक बाजार समित्या भाजपा BJP 53 तर राष्ट्रवादी NCP 50 च्या ताब्यात आल्या. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसून आला. जिल्ह्यातील माजलगाव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज दि.30 एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी झाली. माजलगावच्या बाजार समितीत भाजपाचे मोहन जगतापांनी कडवी झुंज दिली तर माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांनी व्यापारी मतदारसंघात दोन्हीच्या दोन्ही उमेदवारांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत आ. सोळंकेंना धक्का दिला. अत्यल्प मताने आ. प्रकाश सोळंकेंनी अखेर बाजार समितीचा गड राखत वर्चस्व अबादित ठेवले आहे. येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी सात वाजल्यापासुन मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासुनच मतदारांमध्ये उत्साह दिसुन येत होता. दुपारी चार वाजेपर्यंत 96.93 टक्के मतदान शांततेत झाले. सोसायटी मतदार संघात अकरा जागेसाठी 609 मतदारांपैकी 601 मतदारांनी हक्क बजावला तर ग्रामपंचायत मतदारसंघात चार जागेसाठी 553 मतदारांपैकी 549 मतदारांनी हक्क बजावला तर व्यापारी मतदारसंघात दोन जागेसाठी 785 पैकी 733 मतदारांनी हक्क बजावला. हमाल मापाडी मतदारसंघात एक जागेसाठी 233 पैकी 230 मतदारांनी हक्क बजावला. 2180 मतदारांपैकी 2113 मतदारांनी मतदान केले. यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात सहाय्यक निबंधक विकास जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली.
विजयी उमेदवार (पडलेली मतं)
1. कचरे संजय – 274.
2. जगताप मनोज – 276.
3. डक अशोक गोविंदराव – 312.
4. डाके दत्तात्रय – 295.
5. नरवडे जयदत्त – 309.
6. नाईकनवरे उध्दव – 301.
7. सोळंके विरेंद्र प्रकाश – 309.
8. घायतिडक सरस्वती – 301.
9. भोसले अंजली – 295.
10. सजगणे नंदकिशोर – 311.
11. जाधव अमोल – 318.
12. नाईकनवरे नितीन – 302.
13. भागवत शेजुळ – 250.
14. मोरे श्रीहरी – 257.
15. आगे भगवान – 252.
16. नावंदर जुगलकिशोर – 322.
17. प्रभाकर होके – 508.
18. पठाण कदिर पठाण शेरखॉ – 115.