चिंता वाढली… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.16 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 2895 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 165 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2730 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या घटत असताना गेल्या काही दिवसात काहीशी संख्येत वाढ होत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-25, अंबाजोगाई-5, आष्टी-29, धारुर-4, गेवराई-20, केज-28, माजलगाव-6, परळी-14, पाटोदा-7, शिरुर-22, वडवणी-5 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत गेल्या काही दिवसात किंचित वाढ होत आहे. यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी नागरिकांना सक्त ताकिद देत कडक इशारा दिला आहे. जिल्हा तिसऱ्या स्तरातून चौथ्या स्तरात जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्ण संख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.
काल महाराष्ट्रात 08 हजार 129 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 14 हजार 732 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 200 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 58 लाख 17 हजार 121 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.