ऐतिहासिक

मंत्री अमित देशमुखांची धारुर किल्ल्याबाबत सुचना

मुंबईः दि.३- काल दि.२ रोजी मुंबई येथे झालेल्या गड संवर्धन समितीच्या बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख Amit Deshmukh यांनी बीड जिल्ह्यातील धारुर Fort Dharur किल्ल्यात नव्याने बांधलेल्या भिंती वर्षभरातच कशा कोसळल्या याच्या मुळ कारणांचा शोध घेण्याच्या सुचना पुरातत्व विभागास दिल्या.

सोमवारी मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख Amit Deshmukh यांच्या उपस्थितीत गड संवर्धन समिती व पुरातत्व विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील गड किल्ले Fort जतन व संवर्धनासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी दिर्घकालिन योजना आखण्याच्या सुचना करण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील धारुर Fort Dharur किल्ल्यात नव्याने बांधलेल्या भिंती वर्षभरात ढासळल्या विषयी चर्चा होवून याच्या मुळ कारणांचा शोध घेण्याची सुचना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी आ. रोहित पवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, उपसचिव विलास थोरात, गड संवर्धन समितीचे पांडूरंग बलकवडे, मृदुला माने, संकेत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!