मंत्री धनंजय मुंडे यांचा शनिवारी बीड दौरा; बीडमध्ये होणार जिल्हास्तरीय आढावा बैठक

बीड दि. 12 मार्च- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे विविध कामकाजाच्या अनुषंगाने शनिवार दि.13 मार्च 2021 रोजी बीड येथे दौऱ्यावर येत असून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड (Beed) येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक (review meeting) होणार आहे. दुपारी 2.30 वाजता धारुर तालुक्यातील सुकळी येथील लाभार्थ्यांना सानुगृह अनुदान वाटप कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयातुन देण्यात आली आहे.
(Minister Dhananjay Munde’s visit to Dharur on Saturday; District level review meeting to be held in Beed)
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे शनिवार दि. 13 मार्च 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनूसार पुढील प्रमाणे दौरा असणार आहे.
सकाळी 11.00 वा. परळी बायपास संदर्भात आढावा, दुपारी 12.00 वा. सन 2020-21 या वर्षाकरिता बीड (Beed) जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करणेच्या अनुषंगाने आढावा बैठक, दुपारी 1.00 वा.कोविड संदर्भात आढावा बैठक, दुपारी 2.00 ते 2.30 राखीव, दुपारी 2.30 वा. सुकळी, ता. धारुर येथील लाभार्थ्यांना सानुगृह अनुदान वाटप, दुपारी 2.45 वा.फिरते पशु चिकित्सालयाच्या व्हॅनचे उदघाटन, दुपारी 3.00 वा.जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या प्रगतीबाबत आढावा, दुपारी 4.00 वा. रोजगार हमी योजनेच्या कामकाजाचा आढावा.