सर्वच एक्झिट पोल्सचा अंदाज चुकला; पहा पश्चिम बंगालमधील पोल्स व निकाल.

देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन जवळजवळ चार तास तास झाले असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं (TMC) मुसंडी मारली आहे.
(Missed all exit polls; See polls and results in West Bengal.)
सुरुवातीला भारतीय जनता पक्ष (BJP) आणि तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र आता तृणमूल काँग्रेसनं जवळपास 200 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर तासाभरापूर्वी 100 च्या पुढे गेलेला भाजप (BJP) आता 80 च्या जवळ येताना दिसत आहे.
भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता.
दोन दिवसांपूर्वी मतदान संपल्यानंतर आलेले एक्झिट पोल्सचे (Exit polls) आकडे हेच दाखवत होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकहाती लढत देत भाजपचे सत्ताबदलाचे मनसुबे धुळीस मिळवले.
ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सध्या 200 पेक्षा अधिक मतदारसंघांत आघाडीवर असल्यानं सर्व एक्झिट पोल्सचे (Exit polls) अंदाज चुकले आहेत. एकाही एक्झिट पोल्सनं ममतांच्या पक्षाला 200 पेक्षा अधिक जागा मिळतील आणि भाजप 100 च्या खाली राहील असा अंदाज वर्तवलेला नव्हता.
असे होते पश्चिम बंगालचे (West Bengal) एक्झिट पोल्स?
पोल तृणमूल काँग्रेस भाजप
ऍक्सिस 130-156 134-160
एबीपी-सी 152-164 109-121
व्होटर
चाणक्य 180 (+/-11) 108 (+/-11)
रिपब्लिक- 128-138 138-148
सीएनएक्स
प्रत्यक्षात असा आला निकालाचा कल…
बंगालमधील पक्षीय बलाबल – 2021 (आघाडी) (Election Final result 2021)
तृणमूल काँग्रेस -213
काँग्रेस -00
डावे – 01
भाजप – 77
एकूण – 292