आमदार प्रकाश सोळंके यांची साखर संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड.

किल्लेधारूर दि.10 नोव्हेंबर – माजलगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आणि लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक मार्गदर्शक आमदार प्रकाशदादा सोळंके यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. (Sugar Association) मुंबईच्या संचालक पदावर सर्वसाधारण मतदार संघातुन बिनविरोध निवड झाली. आज दि.10 नोव्हेंबर रोजी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई (1) शहर यांनी सदरील निवड जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबईच्या सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीसाठी निवडणुक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेत सर्वसाधारण मतदार संघातुन आमदार प्रकाशदादा सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या माध्यमातुन सहकारी साखर कारखान्याची गुणवत्ता वाढ, शेतकरी व साखर उद्योगांच्या समस्या, कारखान्यास वित्त पुरवठयातील व्यवहारीक अडचणी, साखर निर्यातीचे प्रश्नासंबंधी केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे काम केले जाते.
आमदार प्रकाशदादा सोळंके यांना साखर कारखानदारीत काम करण्याचा तीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी लोकनेते स्व. सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. तसेच शैक्षणिक व सहकारी क्षेत्रात काम केले आहे. राज्याचे मंत्रीमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून आ. सोळंके यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आ.सोळंके (Prakash Solanke) यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा नक्कीच साखर संघावर निवड झाल्यामुळे फायदा होणार आहे. साखर संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल लोकनेते स्व. सुंददराव सोळंके सह. साखर कारखान्याचे चेअरमन (Chairman) धैर्यशीलकाका सोळंके, कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद त्याचबरोबर कार्यकारी संचालक (Executive Director) एम. डी. घोरपडे आणि सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते व हितचिंतकाकडून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.
(MLA Prakash Solanke was elected unopposed to the post of Director of Sugar Association.)