धारुर आत्मदहन प्रकरण… आमदार सोळंके व पोलिसांसमक्ष युवकाचे तहसीलदारांवर गंभीर आरोप; कारवाईची मागणी.

किल्लेधारूर दि.26 जानेवारी – येथील तहसील कार्यालयात आत्मदहन (himself on fire) करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पवन तट या युवकाची आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी भेट घेतली. यावेळी युवकाने तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्यावर गंभीर आरोप केले असून कारवाईची मागणी केली.

(MLA Solanke and youth make serious allegations against tehsildars before police; Demand for action.)

कोविड काळात तहसीलदारांच्या आदेशाने कोविड केअर सेंटरला साहित्य पुरवठा केलेल्या कामाचे देयक मिळण्यासाठी मंडप व्यवसायिक पवन तट याने आज तहसील कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी (Police) तात्काळ युवकास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

घटनेचे गांभिर्य पाहून माजलगाव मतदारसंघाचे आमदार (MLA) प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी सदरील युवकाची धारुर (Dharur) पोलिस ठाण्यात भेट घेतली. यावेळी पवन तट यानी तहसीलदार बिल काढण्यासाठी सतत पैशाची मागणी करत असून 20 हजार रुपये यापुर्वीच दिल्याचे सांगत सतत मानसिक ताण देत असल्याने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगितले.

याप्रसंगी पोलिस निरिक्षक (Police Inspector) नितिन पाटील यांच्यासह माध्यम प्रतिनिधी तसेच माधव निर्मळ, हनुमंत नागरगोजे, सय्यद शाकेर, नितिन शिनगारे, राजू कोमटवार व तट कुटूंबिय उपस्थित होते. पवन तट व कुटूंबियांनी यावेळी तहसीलदार (tehsildar) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसे लेखी निवेदन आ. सोळंके यांना तट कुटूंबियांनी दिले.

पोलिसांनी कायदेशीर नोंद करत पवन तट यांना कुटूंबियांच्या ताब्यात दिले. मात्र तट यांच्या गंभीर आरोपांचे तहसीलदार शिडोळकर यांनी खंडण केले आहे. सदरील प्रकारामुळे मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली असून तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे याप्रकरणात काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!