बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा काय आहे आजची परिस्थिती.

बीड दि.19 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात सध्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ दिसत असून ही तिसऱ्या लाटेची चाहूल समजली जात आहे. आज सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे 4531 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 113 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4418 जण निगेटिव्ह आली आहेत. आजची संख्या आटोक्यात येत 113 वर आली आहे.
(Monday corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-28, अंबाजोगाई-5, आष्टी-25, धारुर-4, गेवराई-6, केज-7, माजलगाव-10, परळी-0, पाटोदा-12, शिरुर-10, वडवणी-6 अशी आहे.
(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. सातत्याने ठराविक ठिकाणी संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आष्टी, गेवराई व पाटोदा या तालुक्यात आज पासून निर्बंध कडक केली आहेत. तर काल बीड तालुक्यातील मांजरसुंभा परिसरात खूद्द जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल, धाबे आदीवर दंडात्मक कारवाई केली आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात काल वाढ झाली. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होती. मात्र त्यात रविवारी वाढ झाली. तसेच कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रविवारी (18 जुलै) राज्यात एकूण 9 हजार कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर 5 हजार 756 जण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यात एकूण 59 लाख 80 हजार 350 जण आतापर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.24% इतका झाला.
रविवारी दिवसभरात एकूण 180 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर हा 2.04% इतका झाला. राज्यात सध्या 5 लाख 67 हजार 585 व्यक्ती होम क्वारटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 66 व्यक्ती संस्थात्मक विलिगिकरणात आहेत. राज्यात एकण 1 लाख 3 हजार 486 सक्रीय रुग्ण आहेत.