कोरोंना विशेष

अंबेवडगावचे सर्व अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यात ७६ पैकी एक पॉझिटीव्ह

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) तालुक्यातील आंबेवडगाव येथील पाठवण्यात आलेली सर्व स्वॕब अहवाल निगेटिव्ह आली असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील ७६ अहवालापैकी बीड मध्ये एक पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळाली.

मुंबईहून परतलेल्या एका संशयिताचे स्वॕब दि.४ रोजी आंबेवडगाव येथील ६५ वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तर दुसऱ्या दिवशी सदरील इसमाच्या दोन सुनांनाही लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आजचे २० अहवाल आज निगेटिव्ह आल्यामुळे आंबेवडगावकरांना दिलासा मिळाला आहे. परंतू आणखी दोन स्वॕब उद्या पाठवण्यात येणार असल्याने उत्कंठा राहणार आहे. जिल्ह्यातून आज पाठवण्यात आलेल्या एकुण ७६ पैकी बीडचा एक कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!