BEED24

MPSC निकाल… टेम्पो चालकाचा मुलगा राज्यात पहिला; आई करते शिवण काम.

मुंबई दि.30 एप्रिल – महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020 ची अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या परिक्षेत सांगलीच्या एका टेम्पो चालकाच्या मुलाने राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020 ची अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादीत परिक्षेत प्रमोद चौगुले यांनी राज्यात प्रथम तर रुपाली माने यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक पटकावला. ऑप्टिंग आऊटच्या (Opting out) प्रक्रियेनंतर शिफारसपत्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. प्रथमच मुलाखती झाल्यानंतर अवघ्या काही तासांत आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मार्च 2021 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. सर्वसाधारणपणे राज्यात प्रमोद चौगुले याने प्रथम, नितेश कदम याने द्वितीय, रुपाली माने हिने तृतीय तर शुभम जाधव आणि अजिंक्य जाधव यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे. निकालाची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार जल्लोष केला.

कोरोनामुळे या परिक्षा लांबणीवर पडल्या होत्या. मोठ्या खंडानंतर निकाल घोषित झाला व यात राज्यात पहिला आल्याबाबत प्रमोद चौगुले म्हणाला, की गेल्या राज्यसेवा परीक्षेत एका गुणाने संधी हुकली होती. त्यामुळे पुन्हा जोमाने अभ्यास केल्याने हे यश मिळाले. ‘युपीएससी’ (UPSC) बरोबरच मी ‘एमपीएससी’ची तयारी करीत होतो. माझे वडील टेम्पो चालक असून, आई गृहिणी आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी येथील प्रमोद बाळासाहेब चौगुले यांनी दुसर्‍या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या MPSC च्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर त्यांच्या सोनी येथे मूळ गावी आणि सांगलीतील घरी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.

प्रमोद चौगुले त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनी येथे झाले. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यालय झाले. त्यानंतर त्यांनी कराड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering) पदवी घेतली. प्रमोद चौगुले यांचे वडील बाळासो चौगुले हे ड्रायव्हर आहेत. तर आई घरी शिवन काम करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत प्रमोद चौगुले यांनी यश मिळवले आहे.

( MPSC results … Tempo driver’s son first in state; Mom does the sewing work. )

Exit mobile version