एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; PSI होण्याचे स्वप्न अधूरे…

जालना दि.5 अॉगस्ट – एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जालना (Jalna) जिल्ह्यातील आंबा येथे घडली. अशोक सोनाजी घुले (३०, रा. आंबा) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

 

(MPSC student dies of heart attack; The dream of becoming a PSI is unfulfilled …)

येथील सोनाजी घुले यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांना पाच एकर शेती असून, त्यांचा मुलगा अशोक घुले हा गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद (Aurangabad) येथे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याला पोलीस उपनिरीक्षक (PSI) बनायचे होते. काही दिवसांवर एमपीएससीची (MPSC) परीक्षा आली होती, परंतू गतवर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षा रद्द होती की, काय याची चिंता त्याला होती.

दोन दिवसांपूर्वीच अशोक हा आंबा येथे आला होता. बुधवारी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी तो शेतात गेला. चार वाजेच्या सुुमारास त्याच्या छातीत दुखू लागले. तो एका झाडाखाली बसला असता, त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे घुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशोकचे पीएसआय बनन्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!