किल्लेधारुर दि.५(वार्ताहर) येथील कटघरपुरा भागातील रहिवासी शहरातील सर्वाधिक वयाच्या श्रीमती रामदुलारी महाविरसिंह हजारी (Hajari) यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी दि.५ शनिवार रोजी पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या अंबाजोगाई Ambajogai येथे त्यांच्या मुलांकडे होत्या.
अंबाजोगाई येथील योगेश्वरी (Yogeshwari college) महाविद्यालयातील सेवानिवृत्त उपप्राचार्य राजबलीसिंह हजारी (Hajari) व खोलेश्वर महाविद्यालयातील (Kholeshwar college) सेवानिवृत्त उपप्राचार्य उदयसिंह हजारी (Hajari) यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थीवावर दुपारी दोन वाजता राजपुत वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. त्यांचे पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परीवार आहे.