म्युकरमायकोसिसचा मराठवाड्याला विळखा; बीडमध्ये 69 रुग्ण तर नांदेडात 104 नॉनकोविड रुग्ण.

औरंगाबाद दि.26 मे – कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस तथा ब्लॅक फंगस (Black fungus) या आजाराने घेरण्यास सुरुवात केली आहे. या आजाराचा हळूहळू मराठवाड्यात विळखा घट्ट होऊ लागला असून, आजवर 701 रुग्णांची नोंद मराठवाडा (Marathwada) विभागात झाली आहे. यात बीड (Beed) जिल्ह्यात 69 रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे नांदेड (Nanded) जिल्ह्यात 104 रुग्ण कोविड न झालेली आढळल्याने चिंता वाढली आहे.

(Mucormycosis in Marathwada; 69 patients in Beed and 104 noncovid patients in Nanded.)

कोरोना संकटाला तोंड देत असताना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या नवीन आजाराने थैमान घातले आहे. मराठवाड्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात सर्वाधिक 337 तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोना न झालेल्या 104 जणांना देखील या आजाराने घेरले असून, हे सर्व रुग्ण नांदेड जिल्ह्यातील आहेत.

विभागीय प्रशासनाने म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराच्या अनुषंगाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी काम करीत आहेत. आजारांच्या लक्षणांपासून उपचार पद्धती, औषधी या बाबींची माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 383 रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 32 सरकारी, तर 182 रुग्ण जीएमसीमध्ये आहेत. खाजगी हॉस्पिटल्समध्ये सर्वाधिक रुग्ण अ‍ॅडमिट आहेत.

नांदेड (Nanded) जिल्ह्यात म्युकरमायकोसिस तथा ब्लॅक फंगसची (Black fungus) 104 नॉनकोविड रुग्ण नांदेड जिल्ह्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये 18, तर जीएमसीमध्ये 86 रुग्णांवर उपचार सुरू असून, हे रुग्ण नॉनकोविड आहेत. त्यांना कोरोना झालेला नव्हता. मात्र, ते म्युकरमायकोसिसच्या आजाराच्या विळख्यात आले.

म्युकरमायकोसिस झालेल्या एका रुग्णाला अ‍ॅम्फोटेरेसिन बी आणि इम्लशनच्या इंजेक्शनचे किमान तीन डोस दिवसभरात लागतात. सध्या विभागात असलेल्या रुग्णांना रोज 2103 इंजेक्शनची गरज आहे. मात्र, 500 च्या जवळपास इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अनेक अडचणी येत आहेत.

इंजेक्शनच्या 100 ते 200 व्हायल्स औरंगाबादेत (Aurangabad) येत आहेत. उर्वरित जिल्ह्यात कमी-अधिक पुरवठा होतो आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे रुग्ण, नातेवाईक या इंजेक्शनसाठी प्रचंड धावपळ करीत आहेत.

कोरोनानंतर म्युकरमायकोसिस झालेले रुग्ण
औरंगाबाद 337, जालना 36, बीड (Beed) 69, लातूर 81, परभणी 4, हिंगोली 12, नांदेड 51, उस्मानाबाद 7 यासह नांदेडच्या 104 नॉनकोविड रुग्णांसह एकूण 701 रुग्ण एकट्या मराठवाड्यात (Marathwada) आढळली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!