कोरोंना विशेष

बीड शहरासह केजमध्ये आढळले नवीन रुग्ण

बीड जिल्ह्याचा आकडा १९

केज दि.१९(वार्ताहर) कोरोना चा कहर बीड जिल्ह्यात आजही पहायला मिळाला असुन बीडसह केज तालुक्यातही आज दोन कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असुन बीड जिल्ह्याची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, आष्टी या भागात आढळणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आता बीड शहरात आढळून आले असून शहरातील मोमीनपुरा आणि सावतामाळी चौक या भागातील पाच जण पॉझिटिव्ह आढळेल आहेत. तर दोन जण केज तालुक्यातील आणि एक जण इटकुर येथील आहेत. बीड शहरातील मोमीनपुरा  आणि सावतामाळी चौक या भागात ठाणे येथून आलेले पाच जण पॉझिटिव्ह आढळेल आहेत .बीड जिल्ह्यात आणखी ८ पोजिटिव्ह आढळून आले आहेत यात इटकूर येथील कोरोनाग्रस्त मुलीची आई – वय ३५, चंदनसावरगाव ता केज – वय २३ मुंबईहून आला, काळेगाव ता.केज – वय २९ मुंबईहून आला. ठाणे येथून आलेले दोघे – वय २२ व ४४ (मोमीनपुरा, बीड), ठाणे येथून आलेले – वय १६, १४ व ३६ (रा सावतामाळी चौक, बीड). नवीन सापडलेल्या रुग्णांमुळे बीड जिल्ह्याचा आकडा आता १९ झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!