बीडमध्ये एकाचा खुन; रिक्षाचा धक्का लागल्याचे कारण.

बीड दि.10 जुलै – गाडीला धक्का लागल्याचे कारण काढून एका रिक्षा चालकास (rickshaw driver) दगड, विटाने मारून गंभीर जखमी केल्याची घटना दि.6 जुलै रोजी शहरातील पेठबीड भागातील शिवनेरी नगर परिसरात घडली होती. गंभीर जखमीस औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना या जखमी चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध काल दि.9 जुलै रोजी पेठ बीड (Beed) पोलिसांत (Police) खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Murder of one in Beed; The reason for the impact of the rickshaw.)

फुलचंद थिमा कुऱ्हाडे (वय 42) असे मारहाणीत मृत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत इमामपूररोड परिसरातील शिवनेरी नगर भागात राहत होते. दि.6 जुलै रोजी ते रिक्षा घेऊन आपल्या घरी जात असताना दुचाकीला धक्का लागल्याने त्यांचा काही जणांसोबत वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

यावेळी सहा जणांनी मिळून फुलचंद यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तत्काळ बीड (Beed) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, फुलचंद यांची प्रकृती चिंताजनक असल्याने औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते.

यावेळी घटनेची माहिती पेठ बीड पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेचे गांभिर्य पाहून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस कान्स्टेबल अमोल दरेकर यांनी घाटी रुग्णालयात जाऊन मयत फुलचंद कुऱ्हाडे यांचा जबाब नोंदवला होता.

दरम्यान, उपचारादरम्यान मारहाणीत गंभीर जखमी रिक्षा चालक (rickshaw driver) फुलचंद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस निरीक्षक मंगशे पाटील, पोलीस उपनिरीक्षक गालीफखॉन पठाण, दासरवाड, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस हेडकाँस्टेबल सौंदरमल, पोलीस नाईक सुनील अलगट, अमोल दरेकर यांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला.

मयताची पत्नी लक्ष्मीबाई फुलचंद कुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर बुधाप्पा देवकर, शिवलाल राजेंद्र सोमवशे, दिनेश राजेंद्र सोमवशे, फुलाबाई राजेंद्र सोमवशे, अनिल बुधाप्पा देवकर (सर्व रा. शिवनेरीनगर, इमामपूररोड, बीड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणातील शिवलाल राजेंद्र सोमवशे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. इतर चार आरोपी फरार असून, पोलिसांचे (Police) पथक त्यांचा शोध घेत आहे. त्यांनादेखील लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगशे पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!