दोन सख्ख्या भावांचा भररस्त्यात खुन; बीड जिल्ह्यातील थरार.

बीड दि.18 मे – पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन भावंडांच्या खुनात झाले. भर रस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून दोन भावांना निर्घृणपणे संपविण्यात आले. राम आत्माराम साळुंके (50) व लक्ष्मण आत्माराम साळुंके (47) अशी मयतांची नावे आहेत. सदरील खुनाची (Murder) खळबळजनक घटना सोमवारी दि.17 रोजी रात्री 11 वाजता बीड (Beed) तालुक्यातील नागापूर(खु.) येथे घडली.

(Murder of two brothers; Thrill in Beed district.)

पंधरा दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती. यावेळी हा वाद आपसात मिटवण्यात आला होता. मात्र, सोमवारी परमेश्वरने दोघां भावांना फोनवरून पुन्हा शिवीगाळ केली. याबाबत त्याला समजावण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके गेले होते.

यावेळी भररस्त्यात परमेश्वर कडून त्यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री पंचनामा करून मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

मंगळवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. परमेश्वर साळुंकेविरुद्ध पिंपळनेर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी परमेश्वर फरार झाला आहे. आरोपीचा शोध पिंपळनेर पोलिस (Police) घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!