अंबाजोगाई दि.2 एप्रिल – आज सर्वत्र मराठी नववर्ष गुडी पाडवा उत्साहात साजरा होत असताना अंबाजोगाईत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरानजीकच्या शेपवाडीत एका पुजाऱ्याचा माथेफिरुने दुपारी एकच्या सुमारास खून (Murder) केला आहे. यामुळे अंबाजोगाईत (Ambajogai) खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या शेपवाडी येथील हनुमान मंदिरात पुजारी संतोष दासोपंत पाठक (वय 50) प्रतिवर्षी प्रमाणे पुजा अर्चा करण्यासाठी सकाळपासून उपस्थित होते. त्यांच्याकडे शेपवाडी गावातील पुजा अर्चा परंपरागत आहे.
दरम्यान, आज (दि.2) दुपारच्या सुमारास एका माथेफिरुने पुजारी संतोष दासोपंत पाठक यांच्यावर दुपारी एकच्या सुमारास चाकुने सपासप वार केले. सदरील प्रकारानंतर ग्रामस्थांनी गंभीर जखमी पाठक यांना तात्काळ स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय (SRTR) अंबाजोगाई येथे हलवले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांस मृत घोषित केले. या घटनेमुळे मात्र शेपवाडीसह अंबाजोगाई परिसरात खळबळ उडाली आहे.
( Murder on the first day of the Marathi New Year; Shocking incident in Beed district. )