ॲटोरिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू; लातूर शहरातील घटना.

लातूर दि.22 जुलै – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसामुळे हाहाकार माजला आहे. राज्यातील कोंकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा सर्वच भागात पावसाने दमदार (heavy rain) हजेरी लावली असून अनेक दुर्घटना घडत आहेत. कोकण विभागात दरडी कोसळून, घरे कोसळून मोठी मनूष्य हानी झाली असून काल नाशिक जिल्ह्यात कारवर झाड कोसळून 3 शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

(Autorickshaw driver killed after tree falls on autorickshaw; Incidents in Latur city.)

यापाठोपाठ आज गुरुवारी दुपारी लातूर शहरात रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारोती सिद्राम काळे (वय 48, रा. चांडेश्वर) असे मृत्यू पावलेल्या रिक्षाचालकाचे (rickshaw driver) नाव आहे. शहरातील उषाकिरण टॉकीज समोरच्या परिसरात ही घटना घडली.

गुरूवारी दुपारी मारोती काळे उषाकिरण टाॅकीज समोर ॲटो रिक्षात (Auto rickshaw) थांबले असताना हा दुर्दैवी अपघात झाला. रस्त्याच्या कडेवरील झाड अचानक रिक्षावर कोसळले. यात काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील प्रवाशी जखमी झाला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर (Latur) शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!