अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास चपलेने बदडले; नेकनूर येथील घटना.

बीड दि.19 ऑगस्ट – पैशाचे आमिष दाखवून अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार (Minor girl assault) केल्याची धक्कादायक घटना बीड  (Beed) तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन (Police station) हद्दीत घडली. बुधवारी या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना नेकनूर पोलीस स्टेशनच्या परिसरात महिला सामाजिक कार्यकर्त्यानी आरोपीला चपलेने मारहाणीचा प्रयत्न केला.

(Naradhamas, who abused a minor girl, was slapped; Incident at Neknur.)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 11 वर्षीय चिमुकलीला खाऊसाठी पैशाचे अमिष दाखवून गावातील 25 वर्षीय आरोपीने तिला मकाच्या शेतात नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. शेजारच्या लोकांनी पाहिल्यानंतर पीडित मुलीची सुटका केली, तसेच आरोपीला चोप दिला. यानंतर आरोपीला पोलिसांच्या (Police) हवाली केले.

या सर्व प्रकरणी नेकनूर पोलिसांत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम भगवान पवार अस आरोपीचं नाव आहे. आरोपी विरुद्ध 376 (अ) (ब), अट्रोसिटी, पॉस्को ऍक्ट (POCSO) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांनी दिली.

दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना नेकनूर पोलीस स्टेशनच्या परिसरात महिला सामाजिक कार्यकर्त्यानी आरोपीला चपलेने मारहाणीचा प्रयत्न केला. या अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जात असून नराधम आरोपीला कठोर शिक्षा करा अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून मागच्या एक महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये बलात्कार (Rape) व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!