शैक्षणिक

Navodaya Vidyalaya … धारुरची प्रगती धस जिल्ह्यात प्रथम.

54 / 100

किल्लेधारुर दि.22 जून – Navodaya Vidyalaya धारुर तालुक्यातील जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालय गांजपुरची विद्यार्थीनी प्रगती शिवाजी धस हिने नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत एनटी (ड) गटातून मुलींत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Navodaya Vidyalaya … Dharur Pragati Shivaji Dhas first in district.

2023 च्या नवोदय विद्यालय Navodaya Vidyalaya प्रवेश पात्र परीक्षा 29 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून या निकालात धारुर Dharur तालुक्यातील जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालय गांजपुरची विद्यार्थीनी प्रगती शिवाजी धस हिने एनटी (ड) गटात मुलींमधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती जीवन शिक्षणचे सहशिक्षक नाथा ढगे यांनी दिली. तिच्या या यशाबद्दल ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. ईश्वर मुंडे, प्राचार्य विजयकुमार मुंडे, उपमुख्याध्यापक अरुण समुद्रे, मार्गदर्शक शिक्षक नाथा ढगे, सचिन चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून विविध व्यक्तीकडून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!