Nawab Malik .. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर.

मुंबई दि.11 अॉगस्ट – Nawab Malik फेब्रुवारी 2022 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांना अटक झाली होती. तब्बल 17 महिन्यानंतर वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. दोन दिवस कायदेशीर कामकाजानंतर ते बाहेर येतील. ( Nawab Malik .. Bail granted to NCP leader Nawab Malik.)
फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाल्यापासून राष्ट्रवादीचे NCP नेता नवाब मलिक Nawab Malik तुरुंगात आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांच्यावर भाजपाकडून मनी लाँड्रिंगचा आरोप करुन देशद्रोही अशी टीका केली जात होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. यानंतर ईडीने केलेल्या कारवाईनंतर ते 17 महिन्यापासून अटक होते. आज सर्वोच्च न्यायालयात supreme court त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. दरम्यान ईडीने सर्वोच्च न्यायालयात supreme court मलिक यांच्या वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेतली नाही. त्यामुळे मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मलिक यांच्याकडे राज्यातील अल्पसंख्यांक समाजाचा एक प्रभावी नेता म्हणून पाहिले जाते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा NCP एक मोठा गट भाजपासोबत सत्तेत गेला असून नवाब मलिक कोणती भुमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.