राजकीय

NCP… शेतकरी पुत्राचा अजित पवारांना धक्का ; बजरंग सोणवने यांचा राजीनामा.

51 / 100

बीड दि.20 मार्च – उपमुख्यमंत्री अजित पवार व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले बजरंग सोणवने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सदर घटना ही अजित पवार व धनंजय मुंडे यांना धक्का मानली जात असून सोणवने हे आज दि.20 मार्च रोजीच शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहिले जात असून सर्वच पक्षांकडून उमेदवार चाचपणी सुरु आहे. बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात यापुर्वी शरद पवारांना अनेक वेळा साथ दिलेली आहे. यामुळे शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी कोण उमेदवार असणार याकडे लक्ष लागून आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा गत लोकसभेचे उमेदवार बजरंग सोणवने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) चे अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर आजच दुपारी साडेचार वाजता पुण्यात त्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोणवने यांच्या प्रवेशानंतर शरद पवार यांच्याकडून संभाव्य उमेदवार म्हणून बजरंग सोणवने यांच्याकडे पाहिले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!