राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत बैठक सुरु; मनसुख हिरेनचा मारेकरी सचिन वाझेच …

दिल्ली दि.21 मार्च – महाराष्ट्रात सुरु असलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपानंतर राजकीय हालचालीना वेग आला असून सध्या दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जनपथ येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress Party) बैठक सुरु झाली आहे. दरम्यान अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही सचिन वाझेच मुख्य आरोपी असल्याचा खुलासा एटीएस कडून जाहिर करण्यात आले आहे.

NCP begins meeting in Delhi; Mansukh Hiren's killer Sachin Wazech ...

या बैठकीच्या पुर्वी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली असून आत्ताच बैठक सुरु असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ (Kamal Nath) बैठकीत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय हालचालीनी वेग घेतला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी काल मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मोठा गौप्यस्फोट करत थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप केला.

यानंतर पुन्हा विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने (BJP) राज्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षभरात भाजपाकडून (BJP) विविध प्रकरणी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती अवलंबली आहे. यापुर्वी सुशांतसिह आत्महत्या प्रकरण, अर्णव गोस्वामी अटक प्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण, पालघर मॉब लिंचिंग, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण व आता सपोनि सचिन वाझे प्रकरणात आक्रमक भुमिका घेतली आहे.

सचिन वाझे प्रकरणाला काल वेगळी कलाटणी मिळाली. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यास महिन्याला 100 कोटी जमा करुन देण्याची जबाबदारी दिली होती असा आरोप केला. यामुळे सध्या राजकीय वातावरण तापलेले असून याच प्रकरणात दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress Party) बैठक सुरु आहे. बैठकीपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) येवून गेल्याने व आता काँग्रेस नेते कमलनाथ (Kamal Nath) बैठकीत उपस्थित असल्याने गुढ वाढले आहे.

दरम्यान, अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही सचिन वाझेच (Sachin Vaze) मुख्य आरोपी असल्याचा खुलासा एटीएस कडून जाहिर करण्यात आले आहे. एटीएस प्रमुख लांडे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत सर्व सहकार्याचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!