राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांचे निधन

सोलापूर दि.२८- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार भारत नाना भालके (Bharat Nana Bhalke) (६०) यांचे निधन झाले आहे. पुणे येथील रुबी (Ruby) रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आ.भारत नाना भालके (Bharat Nana Bhalke) यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. नाना म्हणून परिचित असलेल्या आ.भालके यांच्या निधनाने पंढरपूर (Pandharpur)-मंगळवेढा परिसरात शोककळा पसरली आहे.
कोरोनावर मात करुन ते घरी परतल्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी (Ruby) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारपासून त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुबी (Ruby) हॉल मध्ये जावून आमदार भालके यांना पाहून डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येती बाबत कालच माहिती घेतली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भालके यांच्या निधनाने पंढरपूर (Pandharpur) व मंगळवेढा परिसरातील त्यांच्या चाहत्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत शिस्तप्रिय व कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य करणारा नेता अशी त्यांची ओळख होती.