राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट; आर्यन खान प्रकरणातील ‘तो’ व्यक्ती कोण?

मुंबई दि.6 अॉक्टोंबर – बॉलिवूड अभिनेता (Bollywood star) शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist congress Party) प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबतही फोटो आहेत.

(NCP spokesperson Nawab Malik’s assassination attempt; Who is the ‘he’ in the Aryan Khan case?)

त्यामुळे एनसीबीनं (NCB) सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी विचारला आहे. “एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला (Aryan Khan) घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे.

सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल. मनिष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचे (BJP) उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. एनसीबीने सांगावं त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय?” असंही नवाब मलिक म्हणाले.

मनिष भानुशाली यांचा खुलासा…
या प्रकाराबाबत वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी भानुशाली म्हणाले, ” मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे. मुंबईत ड्रग्ज पार्टी (Drugs party) होणार असल्याची मला माहिती मिळाली होती. ही माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत शेअर केली. आपले तरुण या नरकात ढकलले जात आहेत हे थांबवण्यासाठी मी हे पाऊल उचललं. पण या गोष्टीमुळं माझ्या जीवाला ड्रग्ज तस्करांपासून (Drug smugglers) धोका निर्माण झाला आहे. कारण मी एनसीबीला त्यांच्या कारस्थानांची माहिती देऊन त्यांचा भांडोफोड केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!